13 January 2025 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन शेअर 1.54 टक्के घसरून 65.10 रुपयांवर पोहोचला होता. आता सुझलॉन लिमिटेड कंपनी संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. (सुझलॉन कंपनी अंश)

म्युच्युअल फंड कंपन्याकडून सुझलॉन शेअरची खरेदी

सुझलॉन हा स्टॉक मार्केटमधील रिटेल गुंतवणुकदारांचा सर्वात आवडता शेअर आहे. आता म्युच्युअल फंड कंपन्याही सुझलॉन शेअर त्यांच्या पोर्टफोलिओत जोडत असल्याने मोठ्या कमाईचे संकेत मिळत आहेत. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. नुवामा अल्टरनेटिव्ह क्वालिटेटिव्ह रिसर्च ब्रोकरेजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

नुवामा अल्टरनेटिव्ह क्वालिटेटिव्ह रिसर्च अहवाल

नुवामा अल्टरनेटिव्ह क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या अहवालातील माहितीनुसार, ‘एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि मिरे म्युच्युअल फंड कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीमधील हिस्सा खरेदी केला आहे. कारण, सप्टेंबर तिमाहीपर्यंत या दोन्ही म्युच्युअल फंड कंपन्याची नावं शेअरहोल्डिंगमध्ये सामील नव्हती. तसेच जर या म्युच्युअल फंडांनी सुझलॉन शेअर्समध्ये आधी गुंतवणूक केली असेल तर ही रक्कम 1 टक्क्यांपेक्षा कमी असेल असं नुवामा अल्टरनेटिव्ह क्वालिटेटिव्ह रिसर्चने म्हटलं आहे.

सुझलॉन एनर्जीमध्ये कोणाचा किती हिस्सा

सप्टेंबर तिमाहीनुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये २८ फंडांचा ४.१४% हिस्सा आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा सुझलॉन कंपनीत २३% हिस्सा आहे. मात्र, सुझलॉन एनर्जी कंपनीत ५० लाख छोटे शेअरहोल्डर्स असून त्यांचा एकूण हिस्सा २३.५५% आहे. तसेच बेलग्रेव्ह इन्व्हेस्टमेंट फंडाचा सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये १.८७% हिस्सा आहे.

कंपनीची सध्याची ऑर्डरबुक ५ गिगावॅट

सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची सध्याची ऑर्डरबुक ५ गिगावॅट इतकी आहे, जी सुझलॉन कंपनीसाठी आतापर्यंतची सर्वोच्च ऑर्डरबुक आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतील असं कंपनीने म्हटलं आहे.

मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्म – शेअरला ‘Underweight’ रेटिंग

गेल्याच महिन्यात मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरबाबत ‘Underweight’ रेटिंग दिली आहे. अलीकडच्या उच्चांकापासून तीव्र घसरणीनंतर आता या शेअरमध्ये खरेदीच्या संधी आहेत. सुझलॉन एनर्जी शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या ८६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास २३ टक्क्यांनी घसरला आहे. परंतु, २०२४ मध्ये आतापर्यंत सुझलॉन शेअरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(291)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x