21 April 2025 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सने 3 महिन्यांत दुप्पट परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 23.80 रुपये, आता खरेदी करावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे.

मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्स किंमत दुप्पट वाढली आहे. या कंपनीच्या सुधारित ताळेबंद आणि मजबूत ऑर्डर बुकमुळे शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 23.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

3 महिन्यांत दुप्पट परतावा

मागील तीन महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहे. 5 जून 2023 रोजी सुझलॉन कंपनीचे शेअर्स 11.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

अशाप्रकारे अवघ्या 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने लोकांना 120 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 194 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे सुझलॉन एनर्जी स्टॉक 136 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील बारा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 160 टक्क्यांनी वाढले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 34 हजार कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 27 रुपये होती. आणि नीचांक पातळी किंमत 6.6 रुपये होती. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअल फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, स्टॉकवर 30 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने तब्बल 6 वर्षांनंतर जून 2023 तिमाहीत नफा नोंदवला आहे. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 101 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 66 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

सुझलॉन कंपनीच्या स्टॉकसाठी सर्वात सकारात्मक बातमी ठरली ती म्हणजे कंपनीने QIP च्या माध्यमातून 2000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. आणि कंपनीने आपले 1500 कोटी रुपयेचे कर्ज परतफेड केले. आता ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी मुख्यतः पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतीय पवन ऊर्जा निर्मिती बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीने 33 टक्के वाटा काबीज केला आहे. या कंपनीची जागतिक स्तरावर पवन उर्जा क्षमता 20GW आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत.

नुकताच या कंपनीला टेक ग्रीन पॉवर इलेव्हन प्रायव्हेट लिमिटेड कडून देखील 3 मेगावॅट सीरिजच्या पवन टर्बाइनची एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. आणि टेक ग्रीन पॉवर ही O2 पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीला इंटाग्राम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी देखील 31.5 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर देण्यात आली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 06 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या