18 November 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त उसळी, शेअर सकाळपासून तेजीत, खरेदी करून फायदा उचला

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. या पवन ऊर्जा कंपनीचे शेअर काल 4 टक्के वाढीसह 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होण्याचे कारण म्हणजे कंपनीला नवीन पवनऊर्जा प्रकल्पाचे काम मिळाले आहे. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीला एव्हरन्यु एनर्जी कंपनीकडून एक नवीन प्रकल्प देण्यात आला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 17.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.24% टक्के वाढीसह (सकाळी १०:२५ पर्यंत) 18.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नवीन ऑर्डर तपशील :

सुझलॉन एनर्जी कंपनीला 48 विंड टर्बाइन जनरेटर बसवण्याचे नवीन काम मिळाले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी या ऑर्डर अंतर्गत 100.8 मेगावॅट क्षमेतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी कंपनी 48 विंड टर्बाइन जनरेटर स्थापित करेल. हा प्रकल्प मार्च 2024 मध्ये कार्यान्वित करण्याचे बंधन कंपनीवर असेल. पवनचक्की टर्बाइनचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त, सुझलॉन एनर्जी कंपनी प्रकल्पाचे बांधकाम, अंमलबजावणी आणि कार्यान्वित करण्याशी संबंधित सर्व जबाबदारी पार पाडेल. या प्रकल्पातून निर्माण केली जाणारी वीज व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक वर्गाला पुरवली जाणार आहे.

गुंतवणुकीवर परतावा :

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 208.75 टक्के परतावा कमावून दिला आहे.18 जुलै 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 जानेवारी 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 83.67 टक्के नफा कमावून दिला आहे.

इतर तपशील :

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 18.54 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.43 रुपये होती. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने 2000 कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी इक्विटी शेअर्स जारी करून किंवा परिवर्तनीय बाँड्स किंवा इतर नॉन कन्व्हर्टेबल डेट इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 22 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x