21 April 2025 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, अल्पावधीत शेअर पैसे गुणाकारात वाढवतोय, स्टॉक वाढीचे कारण?

Suzlon Share price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअरवर सर्व तज्ञांचे लक्ष लागले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.24 टक्के वाढीसह.22.86 रुपये किमतीवर करत होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 21.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला इंटीग्रम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 31.5 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र सुझलॉन एनर्जी कंपनीने अद्याप कंत्राटचे मूल्य जाहीर केले नाहीये. सुझलॉन एनर्जी कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, “सुझलॉन एनर्जी समूहाला Integram Energy Infrastructure कंपनीकडून 31.5 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे”. या प्रकल्पाचे काम मे 2024 पासून सुरू होणार आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, “आम्हाला इंटीग्राम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून दुसरी ऑर्डर मिळाली आहे”. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ‘कॅप्टिव्ह’ वापरासाठी उपयोगी ठरणार आहे. यामुळे भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात आणखी प्रगती होणार आहे. मेड इन इंडिया धोरण आणि आत्मनिर्भर भारत योजना सुझलॉन एनर्जी कंपनीच्या विचारसरणीशी सुसंगत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत YTD आधारे 100.47 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 165.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील एका वर्षभरात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 176.58 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share price today on 25 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या