20 September 2024 3:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Suzlon Share Price | संधी सोडू नका! रॉकेट स्पीडने परतावा देणार सुझलॉन शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही दिवसात अप्रतिम कामगिरी केली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 61.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 71 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

या कंपनीने जून तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.02 टक्के वाढीसह 62.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3,817 MW वर गेला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी आपली क्षमता जून तिमाहीत 1,433 मेगावॅट पर्यंत वाढवली आहे. सध्या या कंपनीचे लक्ष आपल्या क्षमतेत आणखी वाढ करण्याचे आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला आपल्या ऑर्डर बूकमधील 3817 MW क्षमतेच्या प्रकल्पाची अंमलबजावणी 2025-26 पर्यंत करायची आहे. ही कंपनी 2025-26 मध्ये देशपातळीवर 5.0-5.5GW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकारने 2030 पर्यंत 500GW गैर-जीवाश्म ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्याची वचनबद्धता घोषित केली आहे. यामध्ये 100GW वाटा पवन ऊर्जेचा असेल.

सुझलॉन एनर्जी कंपनीचा विश्वास आहे की, कंपनी 2027 पर्यंत वार्षिक आधारावर सरासरी 10 GW पवन उर्जा या प्रमाणे 25 GW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प स्थापित करेल. 2030 पर्यंत C&I विभागात 78 GW पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा प्रकल्पांची मागणी वाढू शकते. तथापि, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामाने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर प्रवाहात आणि नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक 64 रुपये या टार्गेट प्राइससाठी ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे.

जून 2024 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 200 टक्के वार्षिक वाढ नोंदवली होती. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 101 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 302 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 231 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon Share Price today on 27 July 2024

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(217)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x