22 November 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | शेअरने 5 वर्षांत दिला 2455% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली - Maharashtranama Marathi

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2.7 टक्के वाढीसह 76.09 रुपये किमतीवर (NSE: SUZLON) ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच सुझलान एनर्जी कंपनीने कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थ प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी OE बिझनेस पार्कसोबत करार केला असल्याची माहिती दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर, वन अर्थ प्रॉपर्टी कंपनी सब-लीजिंग आणि परवाना अधिकारांसह 5 वर्षांसाठी पुन्हा लिजवर दिली जाईल. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.04 टक्के घसरणीसह 75.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने माहिती दिली की त्यांनी OEBPPL च्या सिक्युरिटीज धारकांशी देखील करार केला आहे. यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीला सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी कॉल पर्याय मिळतो. आणि सिक्युरिटीज धारकांना सिक्युरिटीज विकण्यासाठी पुट ऑप्शनचा पर्याय मिळेल.

या कंपनीने आपल्या स्टॉक फाइलिंग एक्सचेंजमध्ये माहिती दिली आहे की, या कराराचे एकूण मूल्य हा 440 कोटी रुपये आहे. मागील महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे 76 टक्के भागभांडवल 660 कोटी रुपयेला खरेदी केले होते. आणि अतिरिक्त 25 टक्के भागभांडवल पुढील 18 महिन्यांत खरेदी केले जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी पवन ऊर्जा सेवा उद्योगात त्याची उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 85 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने लोकांना 2,455 टक्के परतावा दिला आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x