22 February 2025 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 4.43 टक्क्यांनी वधारून 56.86 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन दिवसापासून सुझलॉन एनर्जी शेअर घसरत होता. एकूण 74,896 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी ही अक्षय ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर फायद्याचा ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट काय आहे?

पवन ऊर्जा क्षेत्रात नवीकरणीय ऊर्जेवर भारताच्या वाढत्या लक्षाचा फायदा सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी घेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. डिसेंबर २०२४ मध्ये क्रिसिल रेटिंग्सने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीवरील क्रेडिट रेटिंग ‘क्रिसिल A’ मध्ये अपग्रेड केली होती. त्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीची मजबूत कामगिरी आणि सुधारित नफ्याची रूपरेषा अधोरेखित झाली होती.

सुझलॉन एनर्जी स्टॉक किंमत

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने एका आठवड्यात 4.55 टक्के परतावा दिला आहे. तसेच मागील महिन्याभरात हा शेअर 14.32 टक्के घसरला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत शेअरमध्ये २७ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 29.67 टक्के परतावा दिला आहे. तसेच दोन वर्षांत सुझलॉन शेअरने ४५७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागील पाच वर्षांत सुझलॉन शेअरने 2,372.17 टक्के परतावा दिला आहे.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म रिपोर्ट

तिसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या महसुलात ७७ टक्क्यांची वाढ होऊन तो २,७६२.९ कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा 55 टक्क्यांनी वाढून 315.4 कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार, तिसऱ्या तिमाहीत ऑपरेशनल स्तरावर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा EBITDA 67 टक्क्यांनी वाढून 413.1 कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x