3 January 2025 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK HDFC Mutual Fund | श्रीमंत व्हा, 2000 रुपये SIP वर 4.13 कोटी मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 1.88 कोटी मिळतील Post Office Scheme | पोस्टाची सुपर डुपर हिट योजना, पोस्ट ऑफिसची FD तुमच्या खात्यात जमा करेल 4,12,500 रूपये IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी, GMP सह प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशिंसाठी असेल अत्यंत खास, जीवनात नवीन सुसंधी प्राप्त होतील, काहींना मिळेल अचानक धनलाभ Penny Stocks | 5 पैशाची जादू, श्रीमंत करणारे 8 पेनी शेअर्स, आयुष्य बदलणाऱ्या पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा - Penny Stocks 2025
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मंगळवारी 2024 या वर्षातील शेवटचे ट्रेडिंग सेशन होते. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केट निफ्टी 23600 वर ट्रेड करत होता. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या पडझडीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. तसेच या नवीन अपडेटमुळे शेअरमध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत.

सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 0.88 टक्क्यांनी घसरून 61.96 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 83,957 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीबद्दल अपडेट

क्रिसिल या प्रसिद्ध क्रेडिट रेटिंग एजन्सीने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे दीर्घकालीन रेटिंग A-‘वरून ‘A’ केले आहे. क्रिसिलने केलेल्या या मानांकनातील सुधारणा सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची मजबूत व्यावसायिक स्थिती आणि ऑपरेशन्समधील सतत होणारी सुधारणा दर्शविते. क्रिसिल क्रेडिट रेटिंग एजन्सीने सुझलॉन एनर्जी कंपनीबद्दलचा ‘पॉझिटिव्ह’ दृष्टीकोन कायम ठेवला आहे. यामुळे भविष्यात कंपनीच्या सकारात्मक कामगिरीला बळ मिळेल असे संकेत मिळत आहेत.

कंपनीला 173 कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा मिळणार

इन्कम टॅक्स अपीलल ट्रिब्युनलकडून अनुकूल निर्णय मिळाल्यानंतर सुझलॉन एनर्जी कंपनीला १७३ कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केल्यानंतर क्रिसिल क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून ही सुधारणा करण्यात आली आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअर 3.43% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 6.29% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 17.06% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 60.94% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 2,398.39% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये सुझलॉन एनर्जी शेअर 49.93% घसरला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 60.94% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(284)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x