4 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, शेअर प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा - IPO Watch Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फायदा कुठल्या योजनेत, बँक FD की SCSS योजना, रक्कम जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, यावेळी महागाई भत्त्यात होणार वाढ, बेसिक सॅलरी प्रमाणे इतकी वाढ होणार Horoscope Today | आज काही राशींच्या विद्यार्थ्यांना एक चांगला शैक्षणिक मार्ग मिळेल तर, अनेकांची दैनंदिन कामे चोखपणे पार पडतील Quant Mutual Fund | जबरदस्त योजना, रु.150 SIP बचतीवर मिळतील 2 कोटी रुपये, तर एकरकमी बचतीवर 31 पट परतावा मिळेल EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 65.33 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.05 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 88,437 कोटी रुपये आहे.

क्रिसिलने रेटिंग अपडेट केली

रेटिंग एजन्सी क्रिसिलने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एसई फोर्ज कंपनीच्या २०५ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन कर्जाचे रेटिंग ‘BBB-/Stable’वरून ‘BBB+/Positive’ मध्ये अपडेट केले आहे. तसेच शॉर्ट टर्म रेटिंग ‘A3’वरून ‘A2’ करण्यात आली आहे.

260 कोटींचा दंड माफ केला

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीसाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाने म्हणजे आयटीएटीने निकाल दिल्यानंतर प्राप्तिकर विभागाने २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी २६०.३५ कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे. ही २६०.३५ कोटी रुपयांची रक्कम सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या 200 कोटींच्या तिमाही नफ्याच्या (सप्टेंबर 2024 तिमाही) जवळपास आहे. त्यामुळे कंपनीची अर्थिक स्थिती अजून भक्कम होणार आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 1.26% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 1.19% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 23.43% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 69.69% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 2,534.27% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 2.57% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये सुझलॉन एनर्जी शेअर 47.21% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Wednesday 01 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x