Swan Energy Share Price | मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी रिलायन्सची कंपनीचे अधिग्रहण करणार, हा शेअर खरेदीसाठी झुंबड
Swan Energy Share Price | मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी बीएसई इंडेक्सवर 337.80 रुपये ही विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.93 टक्के घसरणीसह 332.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 4 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा स्टॉक 6.55 टक्क्यांच्या वाढीसह 331.10 रुपयांवर क्लोज झाला होता. 28 डिसेंबर 2022 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT ने रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग म्हणजेच RNEL कंपनीची खरेदी करण्यासाठी Hazel Mercantile Ltd ला परवानगी दिली. त्यानंतर, स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अवघ्या 3 दिवसांत 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Swan Energy Share Price | Swan Energy Stock Price | BSE 503310 | NSE SWANENERGY)
सहा महिन्यांत 80 टक्के वाढ :
स्वान एनर्जीची SPV (स्पेशल पुरपस वेहिकल) Hazel Infra Ltd आणि HML यांनी RNEL कंपनी खरेदी करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. स्वान एनर्जीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, NCLT ने 28 डिसेंबर 2022 रोजी आदेश जाहीर करून रिझोल्यूशन प्लॅनच्या तरतुदींची माहिती दिली आहे. स्वान एनर्जी कंपनीच्या स्टॉकची किंमत मागील सहा महिन्यांत 80 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचवेळी हा स्टॉक मागील एका महिन्यात 21 टक्क्यांनी तर एका वर्षभरात 128 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
व्यवसायात विविधता आणण्याचे प्रयत्न
स्वान एनर्जी कंपनी आपल्या व्यवसायात विविधता आणण्याचे प्रयत्न करत आहे. स्वान एनर्जी कंपनी सध्या वस्त्रोद्योग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात देखील आपली उपस्थिती निर्माण करत आहे. कंपनी आपल्या विविध उपकंपन्यांद्वारे इतर क्षेत्रांमध्ये व्यापार विस्तार करत आहे. स्वान एनर्जी कंपनी आपल्या उपकंपन्याद्वारे एलएनजी पोर्ट टर्मिनल, पेट्रोकेमिकल उत्पादनांचा व्यापार, संरक्षण जहाज बांधणी, यासारख्या व्यवसायात व्यापार विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की RNAVAL चे अधिग्रहण पूर्ण झाल्यास Swan Energy कंपनी नवीन आणि मजबूत उद्योग क्षेत्रात प्रवेश करेल आणि व्यापार विस्तार करेल.
चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-सप्टेंबर या पहिल्या सहामाही काळात कच्च्या मालाच्या उच्च किंमतीमुळे स्वान एनर्जी कंपनीला 107 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी सुध्दा याच कालावधीत कंपनीला 76.86 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत कंपनीच्या महसूलात दुप्पट वाढ झाली असून 403.85 कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Swan Energy Share Price 503310 SWANENERGY check details on 04 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो