18 November 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

Talbros Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हे शेअर्स एका आठवड्यात 31 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, वेळीच एंट्री घ्या

Talbros Share Price

Talbros Share Price | नोव्हेंबर महिन्यात सेन्सेक्स निर्देशांकामध्ये फारशी तेजी पाहायला मिळाली नाही. मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 65970 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी 19794 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात 46 शेअर्स दुहेरी अंकी वाढीसह ट्रेड करत होते.

यापैकी काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. तर 46 पैकी 29 स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत स्पर्श केली आहे. आज या लेखात आपण टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह
टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील एका आठवड्यात टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के, आणि 3i इन्फोटेक कंपनी आपल्या शेअर धारकांना 28 टक्के लार्गाबा कमावून दिला आहे.

सिक्वंट सायंटिफिक
सिक्वंट सायंटिफिक कंपनीने आपल्या शेअरधारकांना 26 टक्के, आणि मून टेक्नॉलॉजी कंपनीने 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर प्रताप स्नॅक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 307 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील आठवड्यात फार्मास्युटिकल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मजबूत कमगिरी करत होते. स्पेशल निफ्टी रिअल्टी इंडेक्स हा मागील ट्रेडिंग आठवड्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा सेक्टर इंडेक्स होता. फिनिक्स मिल्स, ओबेरॉय रियल्टी, प्रेस्टीज इस्टेट या रिअल इस्टेट कंपन्याच्या शेअरने गेल्या आठवड्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होत.

मागील आठवड्यात मिडकॅप सेक्टरमध्ये विमा कंपन्यांच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळ, न्यू इंडिया अॅश्युरन्स, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन या विमा कंपन्याचे शेअर्स अवघ्या एका आठवड्यात 10 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 भरतात गुरु नानक जयंती असल्याने शेअर बाजाराला सुट्टी होती. तज्ञांच्या मते या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कोणतेही नकारात्मक संकेत मिळत नाहीये.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Talbros Share Price NSE 27 November 2023.

हॅशटॅग्स

Talbros Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x