16 April 2025 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

Tanla Share Price | तान्ला स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा

Tanla Share Price

Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.46 टक्क्यांच्या वाढीसह 990.90 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 6.81 टक्क्यांच्या वाढीसह 984.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10.27 टक्क्यांनी घसरली आहे. ( तान्ला प्लॅटफॉर्म कंपनी अंश )

तज्ञांच्या मते तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉकने 900 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर या स्टॉकमध्ये 950 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांनी तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉकमध्ये 1,000 रुपये किमतीवर नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉक 2.07 टक्के घसरणीसह 939.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉक नुकताच 1,250 रुपये किमतीवरून खाली आला आहे. दैनंदिन टेक्निकल चार्टवर हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1,008 रुपये ते 1,050 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 879 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉकने 950 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि 1010 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,010 रुपये किंमत पातळीच्या पार गेला तर शेअर 1,050 रुपये किमतीवर जाऊ शकतो. पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची ट्रेडिंग रेंज 900 रुपये ते 1,100 रुपये दरम्यान असेल.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉकने 950 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. हा स्टॉक पुढील काळात 1,040 रुपये किमतीवर जाऊ शकतो. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 150 दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. तर 200 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवी ट्रेड करत आहे. तान्ला प्लॅटफॉर्म स्टॉकचा 14 दिवसाचा RSI 65.27 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही.

तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या स्टॉकचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 81.26 आहे. आणि P/B मूल्य 20.82 आहे. शेअरची प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS 25.62 च्या इक्विटी ऑन रिटर्नसह 11.35 अंकावर आहे. तान्ला प्लॅटफॉर्म ही कंपनी मुख्यतः जागतिक स्तरावर ॲप्लिकेशन-टू-पर्सन सर्व्हिस मेसेजिंग प्लॅटफॉर्म संबंधित सेवा प्रदान करते.

या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये वायरलेस टेलीफोन उद्योगातील उत्पादन, विकास आणि अंमलबजावणी, एग्रीगेटर सेवा आणि ऑफशोअर डेव्हलपमेंट सेवा यांचा समावेश होतो. मार्च 2024 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 44.15 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tanla Share Price NSE Live 13 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tanla Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या