
Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर यांच्या मते, टाटा एल्क्सी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 9000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( टाटा एल्क्सी कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअर्सचा आरएसआय निर्देशांक सकारात्मक वाढीचे संकेत देत आहे. पुढील काही दिवसांत या स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी टाटा एल्क्सी स्टॉक 0.28 टक्के वाढीसह 8,050 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
तज्ञांच्या मते, टाटा एल्क्सी कंपनीचे शेअर्स सध्या गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. या कंपनीचे शेअर्स 8600 रुपये ते 9000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 7200 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. टाटा एल्क्सी कंपनीचे शेअर्स 9,191.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपेक्षा 11 टक्के खाली ट्रेड करत आहेत. टाटा एल्क्सी कंपनीचे शेअर्स 6,015.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 36.2 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे.
मागील सहा महिन्यांत टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 738.5 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2014 मध्ये टाटा एल्क्सी स्टॉक 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अवघ्या 10 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 90 रुपयेवरून वाढून 9000 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. टाटा एल्क्सी कंपनीने जून 2001 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 24 वेळा लाभांश वाटप केला आहे. 2023 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 60.60 रुपये लाभांश वाटप केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























