22 November 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर टाटा एलेक्सी शेअर्सची पुढची टारगेट प्राईस जाहीर, मोठा फायदा

Tata Elxsi Share Price

Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर 12 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स 7,635 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र तरीही ब्रोकरेज जिओजितच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काही दिवसात 1400 रुपयेची वाढ पाहायला मिळू शकते. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा एलेक्सी स्टॉक 1.49 टक्के वाढीसह 7,714.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज हाऊसच्या मते, टाटा एलेक्सी कंपनीला आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी मोठ्या डील प्राप्त करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या कंपनीने IDV वर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. अमेरिकन आयटी मार्केटमध्ये मंदी असून देखील टाटा एलेक्सी कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत YOY आधारे 12 टक्के आणि QoQ आधारे 3.7 टक्के महसुल वाढ साध्य केली आहे. टाटा एलेक्सी कंपनीच्या हेल्थकेअर अँड लाइफ सायन्स डिपार्टमेंटने महसुलात QoQ आधारे 4.6 टक्के वाढ साध्य केली आहे.

जिओजित फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 8,989 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 17.5 टक्के अधिक आहे. टाटा एलेक्सी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47,644.28 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत टाटा एलेक्सी कंपनीने 206.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही दर तिमाही आधारावर 3.2 टक्के, आणि वर्ष दर वर्ष आधारे 6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. टाटा एलेक्सी कंपनीच्या ऑपरेशन्समधील मिळालेल्या महसूल संकलनात तिमाही दर तिमाही आधारावर 3.7 टक्के आणि वर्ष दर वर्ष आधारावर 11.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

नुकताच टाटा एलेक्सी कंपनीने संयुक्त अरब अमीरात बाजारपेठेत वाटिका शॅम्पूसाठी एक नवीन पॅकेजिंग डिझाइन बनवली आहे. केसांची निगा राखणारा प्रसिद्ध ब्रँड वाटिका हेअरकेअर शॅम्पूने उत्पादन वाढीसाठी आपला ब्रँड रिफ्रेश केला होता. याचे नवीन डिझाईन बनवण्याचे काम टाटा एलेक्सी कंपनीने केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Elxsi Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x