22 January 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाख रुपयांवर दिला 1.20 कोटी परतावा, डिटेल्स वाचा

Tata Elxsi Share Price

Tata Elxsi Share Price | IT आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित टाटा समूहाच्या ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स या काळात 96 रुपयांवरून वाढून 6000 रुपयावर पोहचले आहेत. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10760.40 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5708.10 रुपये होती. (Tata Elxsi Limited)

1 लाखावर 1.2 कोटी परतावा :
13 एप्रिल 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 1041 शेअर्स मिळाले असते. सप्टेंबर 2017 मध्ये ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या एकूण शेअर्सची संख्या 2082 झाली असती. काल 3 एप्रिल 2023 रोजी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 1.19 टक्के वाढीसह 6,029.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा परिस्थितीत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.2 कोटी रुपये झाले असते.

3 वर्षात 800 टक्के परतावा :
‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 639.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 मार्च 2023 रोजी या टाटा ग्रुप कंपनीचे शेअर्स BSE मध्ये 5,961.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 831 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 9.31 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Tata Elxsi Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x