23 February 2025 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP

Tata Group IPO

Tata Group IPO | टाटा गृप म्हणजे विश्वास ठेवता येईल असं ब्रँड म्हणावं लागेल. टाटा ग्रुपच्या एखाद्या कंपनीत सुरुवातीपासून आयपीओमार्फत गुंतवणूक करणारे आज करोडपती झाले आहेत. आता टाटा ग्रुपची अजून एक कंपनी शेअर बाजारात आयपीओ लाँच करणार आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे.

टाटा ग्रुपच्या टीसीएस आयपीओनंतर तब्बल १९ वर्षांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच करण्यात आला होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) हा २००४ मध्ये आयपीओ लाँच केला होता. त्यावेळी या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे करोडपती झाले आहेत.

कंपनी स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण करेल

टाटा ग्रुपमधील अजून एका कंपनीचा आयपीओ लवकरच काही महिन्यांत लाँच होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा आयपीओ टाटा प्रोजेक्ट्स कंपनीचा असणार आहे. टाटा प्रोजेक्ट्स कंपनीच्या सीईओंनी इकॉनॉमिक टाइम्सशी संवाद साधताना याचा उल्लेख केला. तसे झाल्यास अवघ्या काही महिन्यातच टाटा समूहाची अजून एक कंपनी स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण करेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी प्राप्त होणार आहे.

टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी पुढील 12-18 महिन्यांत आयपीओ’चा पर्याय निवडू शकते. सोप्या शब्दात सांगायचे तर टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी सातत्याने चांगला व्यवसाय करण्यात यशस्वी झाली तर आयपीओ मार्फत त्याला मोठं रूप देण्याची शक्यता वाढेल असं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरव्हॅल्यू २०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल, असा अंदाज विनायक पै यांनी व्यक्त केला होता. सध्या टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीची बुकऑर्डर 40,000 कोटी रुपयांची आहे.

टाटा प्रोजेक्ट्समध्ये टाटा ग्रुपचा हिस्सा किती?

टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीत टाटा सन्सचा सर्वात मोठा हिस्सा आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीत टाटा सन्सचा ५७.३१% हिस्सा आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीत टाटा पॉवरचा ३०.८१% टक्के, टाटा केमिकल्सचा ६.१६ टक्के, व्होल्टासचा ४.३ टक्के आणि टाटा इंडस्ट्रीजचा १.४२ टक्के हिस्सा आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती

गेल्या आर्थिक वर्षात टाटा समूहाच्या टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न १७,७६१ कोटी रुपये होते. या काळात टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ८२ कोटी रुपये होता. तसेच मागील २ आर्थिक वर्षात टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला तोटा सहन करावा लागला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Group IPO Saturday 14 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Group IPO(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x