15 January 2025 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा, या शेअरने 9 दिवसांत 123 टक्के परतावा दिला, वेगाने पैसा देतोय शेअर, नोट करा नाव

Tata Group Stocks

Tata Group Stocks | भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणजेच टाटा ग्रुप. टाटा ग्रुपने आपल्या गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही. टाटा ग्रुप मध्ये अनेक कंपन्यांचा समावेश होतो, आणि बहुतेक सर्व कंपन्या या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. आज आपण टाटा ग्रुप च्या एका अश्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये सातत्याने अप्पर सर्किटवर धडक मारली आहे. या कालावधीत टाटा समूहातील हा शेअर जवळपास 123 टक्क्यांनी वाढला आहे. ह्या शेअर चे नाव आहे TRF लिमिटेड. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये TRF चा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटवर 375.40 रुपये बाजार भावाने ट्रेड करत होता.

6 वर्षांच्या उच्चांक किमतीवर शेअर :
TRF लिमिटेडचा शेअर सध्या 375.40 रुपये या किमतीवर ट्रेड करत आहे. ही स्टॉकची सहा वर्षांची उच्चांकी किंमत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये BSE निर्देशांकावर स्टॉकमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. जुलै 2016 पासून टाटा ग्रुपमधील या TRF कंपनीचा शेअर सातत्याने उच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. TRF लिमिटेड कंपनीची मालकी टाटा स्टीलकडे असून 30 जून 2022 पर्यंत TRF कंपनीमध्ये टाटा स्टीलची 34.11 टक्के गुंतवणूक होती.

1 लाखावर दिला 123 टक्के परतावा :
12 सप्टेंबर 2022 रोजी TRF लिमिटेड चा शेअर 168.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या शेअर 375.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. TRF च्या शेअरने मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये 123 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 9 दिवसांपूर्वी 1 लाख रुपये टाकले असते, तर आता त्याला 2.22 लाख रुपयांचा नफा झाला असता. वार्षिक सरासरी दर वाढ नुसार शेअरने आतापर्यंत 174.42 टक्केचा परतावा कमावून दिला आहे. TRF लिमिटेड कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्राचे विकास प्रकल्प हाती घेते, उदाहरणार्थ बंदरे आणि औद्योगिक क्षेत्र, स्टील प्लांट, सिमेंट, खते आणि खाणकामासाठी वीज आणि साहित्य प्रकल्प व्यवस्थापन, असे विकास प्रकल्प कंपनी हाती घेते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock of TRF Limited share price return on investment on 23 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x