17 April 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा! या शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, हा स्टॉक खरेदी करणार?

Tata Group Stock

Tata Group Stock | Tata समूहाचा भाग असलेली अशी एक कंपनी आहे जिने आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. आम्ही ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, तिचे नाव आहे,”व्होल्टास”. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2022 या वर्षी टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून सातत्याने पडझड पाहायला मिळाली आहे. चला तर मग कंपनीचे तिमाही निकाल तसेच स्टॉकच्या कामगिरीवर एक नजर टाकू.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 808 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी voltas कंपनीचे शेअर 806.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि ही स्टॉकची 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी होती. मागील एका महिन्यात Voltas कंपनीच्या शेअर्समध्ये 6.68 टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी Voltas कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 18.85 टक्क्यांनी घटले आहे. 2022 मध्ये व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये 34.48 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.

तिमाही निकालांनी धक्का दिला :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत व्होल्टास कंपनीला 6 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्याचवेळी मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Voltas कंपनीने 104 कोटी रुपयांचा निव्वळ नफा संकलित केला होता. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली होती. वार्षिक आधारावर व्होल्टास कंपनीचे उत्पन्न 5.5 टक्क्यांनी वाढले असून 1833 कोटी रुपयेवर पोहोचले आहे.

एलआयसीची गुंतवणूक वाढ :
LIC ने Voltas कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीमध्ये एकूण 8.8484 टक्के गुंतवणूक होल्ड केली आहे. यापूर्वी एलआयसीची या कंपनीतील एकूण गुंतवणूक भागीदारी 6.862 टक्के होती. स्टॉक मार्केट नियामकला दिलेल्या माहितीनुसार भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC ने 10 ऑगस्ट 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीत या Voltas कंपनीच्या स्टॉकमधील आपली गुंतवणूक 2.02 टक्क्यांनी अधिक वाढवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock of Voltas Limited Share price return on 21 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या