17 April 2025 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला

Tata group company

Tata Group Stocks | भारतीय शेअर बाजारात BSE आणि NSE वर टाटा समूहाच्या अनेक कंपन्या लिस्टेड आहेत. बऱ्याच कंपनीच्या नावामध्ये टाटा यांचे नाव वापरले गेले नाही. मात्र हा कंपनी आहेत फक्त टाटा समूहाचेच.अशीच एक टाटा समूहाची कंपनी म्हणजे इंडियन हॉटेल्स कंपनी. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही टाटा समूहाची एक हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. ही कंपनी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, जंगल सफारी, पॅलेस, स्पा आणि इन-फ्लाइट केटरिंग सेवांचा व्यवसाय करते.

ही कंपनी टाटा समूहाचाच भाग असून त्यातील प्रमुख भागधारक “टाटा ट्रस्ट” आहेत. कंपनीचे प्रमुख हॉटेल मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल हे आहे. 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी मुंबईतील ताज हॉटेलची स्थापना केली होती. आणि याचे मुख्यालय मुंबई येथे स्थापन केले होते. जगातील 4 खंडांमध्ये एकूण 80 देशात 196 हून अधिक हॉटेल्स आणि 12 देशांमध्ये 20,000 हून अधिक रूम्स आणि 25,000 कर्मचारी ह्या कंपनीकडे आहेत. ही एक अशी कंपनी आहे, ज्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेले पैसे फक्त 1 वर्षात दुप्पट झाले आहेत. एवढेच नाही तर यातून पुढील काळात आणखी कमाईची अपेक्षा आहे.

मागील 1 वर्षाचा परतावा :
इंडियन हॉटेल्सच्या स्टॉकने मागील 1 वर्षात भागधारक जबरदस्त परतावा दिला आहे. 20 ऑगस्ट 2021 रोजी बीएसईवर हा शेअर 134.32 रुपयेवर ट्रेड करत होता. आज त्याची किंमत 275.60 रुपयांवर गेली आहे. या कालावधीत शेअर्स नी तब्बल 105.18 टक्के उसळी घेतली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 2.05 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.

2022 मध्ये आतापर्यंत परतावा :
चालू वर्ष 2022 मध्येही इंडियन हॉटेल्स कंपनी ने भरघोस परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी बीएसईवर स्टॉक 184.35 रुपये किमतीवर गेला होता. सध्या स्टॉक ची किंमत 275.60 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत या कंपनी च्या शेअर्स मध्ये तब्बल 49.50 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लावलेले 2 लाख रुपये आता 3 लाख रुपये झाले आहेत. कंपनीचे बाजार भांडवल 39,146.21 कोटी रुपये आहे. 52-आठवड्यांची उच्चांक किंमत 281.10 रुपये असून आणि नीचांकी किंमत 128.93 रुपये आहे.

अपेक्षित उत्पन्न :
ब्रोकरेज फर्म जेफरीजने इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सवर सकारात्मक रेटिंग दिली आहे आणि स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी पुढील लक्ष किंमत 325 रुपये असेल. जर सध्याच्या 275.60 रुपयांच्या किमती शेअर 325 रुपयांपर्यंत गेला तर तुम्हाला एकूण 18 टक्के नफा मिळू शकतो.

मागील 6 महिन्यांचा परतावा :
21 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच 6 महिन्यांपूर्वी हा स्टॉक बीएसईवर 204.85 रुपयांवर गेला होता. आता त्याची किंमत 275.60 रुपयांवर गेली आहे. या कालावधीत या शेअर्स मध्ये तब्बल 34.54 टक्के वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात शेअर्स मध्ये सुमारे 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याने मागील 5 वर्षांत 172.55 टक्के परतावा दिला आहे. जुलै 1995 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत या स्टॉकमध्ये तब्बल 540.48 टक्के वाढ झाली आहे.

तिमाही निकाल :
इंडियन हॉटेल्स कंपनीने जूनच्या अखेरच्या तिमाहीत 1266 कोटीं रुपये कमावले. ही कमाई मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 267 टक्क्यांनी अधिक वाढली आहे. या हॉटेल कंपनीने मागील तिमाहीत 181 कोटी रुपयेचा नफा कमावला होता. तर गेल्या वर्षी जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 302 कोटींचा तोटा झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata group Stocks company Indian hotels limited share price returns on 19 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

indian hotel(3)Tata group company(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या