Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा 72 रुपयांचा शेअर वरदान ठरला, तब्बल 7730% परतावा दिला, पुढेही फायद्याचा

Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी कोरोना काळात 630 रुपये पर्यंत खाली आले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 5500 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. ज्या लोकांनी कोरोना काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये नीचांक किमतीवर गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 800 टक्के वाढले आहेत.
टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28560 कोटी रुपये आहे. डिसेंबर तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.53 टक्क्यांच्या वाढीसह 5680 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.41 टक्के घसरणीसह 5,480.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 6100 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1730 रुपये होती. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्के वाढली आहे. तर अवघ्या 5 दिवसांत या कंपनीचा स्टॉक 24 टक्के मजबूत झाला आहे.
6 जानेवारी 1999 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 5500 रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहे. ज्या लोकांनी 1999 साली या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 7730 टक्के वाढले आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 53.30 टक्क्यांच्या वाढीसह 53 कोटी रुपयेपेक्षा अधिक नोंदवला गेला आहे. या कारणामुळे कंपनीचे शेअर्स एका दिवसात 18 टक्क्यांनी वाढले होते. या कंपनीच्या शेअर्सने अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या शेअरधारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या महसुल संकलनात 34.2 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेश कंपनीनच्या शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये मंगळवारी 13 पट अधिक वाढ नोंदवली गेली होती. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आता ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. म्हणून तज्ञांनी स्टॉक घसरल्यावर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Investment Share Price NSE Live 31 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER