22 October 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसचा योग्य ठिकाणी वापर कसा करावा जाणून घ्या, डोक्यावरचा आर्थिक भार हलका होईल Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मोठी झेप घेणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तुफान तेजीने संकेत, फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, मल्टिबॅगर शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी - BOM: 543499 Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY NHPC Share Price | NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 49% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: NHPC
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तुफान तेजीने संकेत, फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेश सरकारकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: TATAMOTORS) झाला आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला स्पर्धात्मक ई-निविदा प्रक्रियेनंतर हा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)

उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टनुसार, टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 1000 युनिट डिझेल बस चेसिसचा पुरवठा करणार आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी आणि उत्तर प्रदेश सरकारच्या परस्पर सहमतीच्या अटींनुसार टप्प्याटप्प्याने डिझेल बस चेसिसचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने दिली आहे.

नवीन कॉन्ट्रॅक्ट बद्दल माहिती
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे कमर्शिअल पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे अधिकारी म्हणाले, “टाटा LPO 1618 बस चेसिस उच्च अपटाइम, कमी देखभाल आणि ऑपरेटिंग खर्चासह मजबूत आणि विश्वासार्ह युक्ती प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मार्गदर्शनानुसार पुरवठा सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मागील वर्षी देखील टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेश सरकारकडून 1350 बस चेसिस पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता.

टाटा मोटर्स शेअरची सध्याची स्थिती
सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.81 टक्के घसरून 902.75 रुपयांवर पोहोचला होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 3,32,541 कोटी रुपये आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.32 टक्के घसरून 882.35 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात हा शेअर 7.27% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 39.45% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 611% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 14.19% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x