22 January 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Tata Motors Share Price | टाटा शेअरमध्ये नो घाटा! तिमाही निकालानंतर टाटा मोटर्स शेअर तेजीत, स्टॉक टार्गेट प्राईस पहा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | भारतातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपले डिसेंबर 2022 तिमाही निकाल जाहीर केले आहे. 2022 2023 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये टाटा मोटर्स कंपनीने मजबूत नफा कमवला आहे. या तिमाही मध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3043 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या विक्रीत अप्रतिम वाढ झाली. आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 6.67 टक्के वाढीसह 447.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)

कंपनीच्या उत्पन्नात वाढ :
2021-22 या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीला 1,451 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. टाटा मोटर्स कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवलेल्या माहितीत म्हटले आहे की, डिसेंबर 2022 या तिमाही मध्ये कंपनीने 88489 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीने 72,229 कोटी रुपये महसूल कमावला होता.

निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ :
टाटा मोटर्स कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत जाहीर केलेल्या आर्थिक निकालानुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 506 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2021 या तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा निव्वळ नफा 176 कोटी रुपये होता. टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ब्रिटीश युनिट ‘जग्वार लँड रोव्हर’ कंपनीचा महसूल डिसेंबर 2022 तिमाहीत 28 टक्क्यांनी वाढून सहा अब्ज पौंडवर गेला आहे.

शेअरची नवी टार्गेट प्राईस
ग्लोबल ब्रोकरेज कंपनी सीएलएसएने टाटा मोटर्सला खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच टार्गेट प्राइस ५१२ रुपयांवरून ५२४ रुपये करण्यात आला आहे. मॉर्गन स्टॅनलीने टाटा समूहाच्या ऑटो स्टॉकबाबत ‘ओव्हरवेट’ मत दिले आहे. हे टार्गेट ५०२ वरून ५१० करण्यात आले आहे. ब्रोकरेज हाऊस नुवामा वेल्थ मॅनेजमेंटने टाटा मोटर्सवर खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे. १२ महिन्यांचे उद्दिष्ट प्राईस टार्गेट 502 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले आहे.

टाटा मोटर्स शेअरची कामगिरी :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये 2.86 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 8.78 टक्क्यांची म्हणजेच 33.80 रुपयांची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. YTD आधारे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये 6.03 टक्क्यांची वाढ पह्याला मिळाली. उत्तम तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे आज टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे, आणि शेअरची किंमत 447.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर 2023 या नवीन वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने लोकांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर लोकांना 9 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्यासल शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 528.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 366.20 रुपये होती. 1 जानेवारी 1999 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 31.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये 1192 टक्क्यांची वाढ होऊन शेअरची किंमत सध्याच्या किंमत पातळीवर पोहोचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Motors Share Price 500570 TataMotors stock market live on 27 January 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x