28 January 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी शेअर बाजार खुला होताच टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र काही वेळाने टाटा मोटर्स शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 711 रुपयांवर पोहोचला होता.

सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी टाटा मोटर्स कंपनी शेअर 2.94 टक्क्यांनी घसरून 712.50 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी सकाळी टाटा मोटर्स शेअर 732.95 रुपयांवर उघडला होता आणि तोच शेअरचा दिवसभरातील उच्चांक होता. पण दिवसभरात या शेअरने 711 रुपयांचा नीचांक गाठला होता.

मागील ५ दिवसात टाटा मोटर्स शेअर 9.11 टक्क्यांनी घसरला आहे. विशेष म्हणजे टाटा मोटर्स कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल जाहीर करूनही गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 36.74 टक्क्यांनी घसरला आहे.

ट्रेंडीलाइन रिपोर्टनुसार तेजीचे संकेत

ट्रेंडीलाइन रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स शेअर्ससाठी 949 रुपये ही एव्हरेज टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. विश्लेषकांनी या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. म्हणजे शेअरमध्ये सध्याच्या पातळीवरून 32 टक्क्यांच्या तेजीचे संकेत देण्यात आले आहेत. म्हणजे या रिपोरनुसार येत्या काही महिन्यांत टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे सकारात्मक संकेत दिसत आहेत.

शेअरखान ब्रोकरेज फर्म – टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस

शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1,099 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने निश्चित केलेली टार्गेट प्राईस ट्रेंडीलाइन रिपोर्टच्या तुलनेत अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price Monday 27 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x