15 January 2025 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, किती फायदा होणार?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की, त्यांच्या जग्वार लँड रोव्हर म्हणजेच जेएलआर कंपनीच्या वार्षिक विक्रीत मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

JLR कंपनीची विक्री 20 टक्केपेक्षा अधिक वाढली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या वार्षिक घाऊक विक्रीत 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 1,016.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मार्च 2024 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीच्या घाऊक विक्रीमध्ये 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च तिमाहीत या कंपनीची घाऊक विक्री 1.10 लाख युनिट्सवर गेली होती. टाटा मोटर्स कंपनीच्या किरकोळ विक्रीत 22 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीने 4.31 लाख युनिट्स वाहनांची विक्री केली होती. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 1.14 लाख युनिट्स वाहनांची विक्री केली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 1013.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 222.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 131.51 टक्के वाढवले आहे.

मागील 3 महिन्यांत टाटा मोटर्स स्टॉक 28.40 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 46.37 टक्के शेअर्स धारण केले आहे. तर परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी कंपनीचे 18.62 टक्के शेअर धारण केले आहेत. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्स कंपनीचे एकूण 17.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 17.6 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 09 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x