15 January 2025 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.81 टक्क्यांच्या घसरणीसह 947.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स स्टॉक 1,065.60 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवरून 11.11 टक्क्यांनी घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.60 टक्के घसरणीसह 932.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

एमके ग्लोबल फर्मच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर आले आहेत. नुवामा फर्मच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचा तिमाही महसूल आणि EBITDA अंदाजापेक्षा कमी आला आहे. टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जेएलआर कंपनीची ऑर्डर बुक डिसेंबर 2023 मध्ये 1,48,000 युनिट्सवरून मार्च 2024 मध्ये 1,33,000 युनिट्सवर आली आहे.

टाटा मोटर्स कंपनीने मार्च 2024 तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक 45.67 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 17,529 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 12,033 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीची एकत्रित विक्री 13.3 टक्क्यांच्या वाढीसह 1,19,986 कोटी रुपये नोंदवली गेली होती.

टेक्निकल सेटअपवर टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 900 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1,000 च्या आसपास प्रतिकार पाहायला मिळत आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, जर टाटा मोटर्स स्टॉक 945 रुपयेच्या खाली आला तर शेअर 920-910 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर हा स्टॉक 990-995 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 1,008-1,030 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 1,050 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि 940 रुपये किमतीजवळ मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये वाढ होण्यासाठी शेअरची किंमत 980-985 रुपयेवर जाणे आवश्यक आहे.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 900 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1,050 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 977 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तर 935 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 935 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअर 894 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 910 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1,000 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,000 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत हा शेअर 1,030 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची ट्रेडिंग रेंज 900 रुपये ते 1,040 रुपये दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 16 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x