14 January 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची रेटिंग अपग्रेड, स्टॉक प्राईस 1294 रुपयांची पातळी गाठणार, खरेदीचा सल्ला

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक गुरूवारी 4 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 1071 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. यासह तज्ञांनी शेअरची टारगेट प्राइस 1,294 रुपये निश्चित केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

नोमुरा फर्मला विश्वास आहे की, जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या मजबूत कामगिरीमुळे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळू शकते. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.069 टक्के घसरणीसह 1,090.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन व्यवसायाची प्रस्तावित डिमर्जर योजना कंपनीच्या CV व्यवसायासाठीचे मूल्य अनलॉक करू शकते. ब्रोकरेज फर्मच्या सकारात्मक भूमिकेमुळे टाटा मोटर्स स्टॉकमध्ये उत्साही व्यवहार पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 137 टक्के वाढली आहे.

25 ऑगस्ट 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 593.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. गुरूवारी या कंपनीचे 51.37 कोटी रुपये मूल्याचे 4.87 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.55 लाख कोटी रुपये आहे. नोमुरा फर्मने JLR साठी टार्गेट मल्टिपल त्याच्या एंटरप्राइज व्हॅल्यू-टू-EBITDA च्या तुलनेत 2.75 पटीने वाढवून 3.5 पट केले आहे.

टाटा मोटर्स कंपनीचा EBITDA मार्जिन आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 8.5 टक्केवर जाऊ शकतो. 2027 पर्यंत कंपनीचा EBITDA 10.1 टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आणि 2030 पर्यंत या कंपनीचा EBITDA 11-12 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा मोटर्स कंपनी 1 ऑगस्ट रोजी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल. 2023-2024 च्या या आर्थिक वर्षात टाटा मोटर्स कंपनीने 17,407 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

टाटा मोटर्स कंपनीने मार्च 2024 तिमाहीमध्ये 5,400 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल 14 टक्के वाढीसह 1.20 लाख कोटी रुपये नोंदवला गेला होता. कंपनीचा EBITDA किंवा व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई वार्षिक 33 टक्के वाढून 12,810 कोटी रुपयेवरून 17,035 कोटींवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 26 July 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x