15 November 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांनी काय म्हटले? पुढची टार्गेट प्राईस?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 790 अंकांच्या घसरणीसह 72,304 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक देखील 247 अंकांच्या घसरणीसह 21,951 अंकावर क्लोज झाला होता.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑटो, मीडिया, सरकारी बँकिंग आणि मेटल सेक्टरमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 958 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 954.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गेल्या एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 120 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 38 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.18 लाख कोटी रुपये आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 958 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 976.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 400.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 29 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x