Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअरची टार्गेट प्राईस माहिती आहे? तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या
Tata Motors Share Price | मागील काही महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी पुढील काळात कायम राहू शकते. टाटा मोटर्स शेअर 670 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर 670 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील इतर तज्ञांनी देखील सरासरी लक्ष्य किंमत 589.02 रुपये निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 587.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
तज्ञांचा सल्ला :
शेअर बाजारातील 33 तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर आपले मत व्यक्त केले आहेत. यापैकी 13 जणांनी टाटा मोटर्स स्टॉक तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 14 जणांनी स्टॉक घसरणीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तीन तज्ञांनी स्टॉक विक्रीची शिफारस केली आहे.
शेअरहोल्डिंग प्रमाण :
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीच्या प्रवर्तकांकडे 46.39 टक्के भाग भांडवल आहे. तर परकीय गुंतवणूकदार टाटा मोटर्स शेअरकडे आकर्षित होत आहेत. मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार परकीय गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत आपली गुंतवणुक 13.89 टक्क्यांवरून वाढवून 15.34 टक्क्यांवर नेली आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली शेअरहोल्डिंग 15.07 टक्क्यांवरून वाढवून 17.56 टक्क्यांवर नेली आहे. तर टाटा मोटर्स कंपनीमध्ये म्युच्युअल फंडाने 8.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 24.68 वरून घसरुन 20.71 टक्केवर आली आहे.
टाटा मोटर्स लाभांश :
12 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. तर यापूर्वी 30 जून 2023 रोजी कंपनीने 10 टक्के लाभांश जाहीर केला होता. 29 मे 2014 रोजी 100 टक्के लाभांश जाहीर केला होता. तर 29 मे 2013 रोजी 100 टक्के आणि, 29 मे 2012 रोजी 200 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.
शेअर किंमत इतिहास :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 591.90 रुपयेवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा मोटर्स स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 602.30 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 375.20 रुपये होती.
टाटा मोटर्स कंपनी 17 जुलै 2023 पासून आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ही दरवाढ सर्व वाहन मॉडेल्स आणि व्हेरियंटवर लागू असेल. टाटा मोटर्स कंपनी आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये सरासरी 0.6 टक्क्यांची वृध्दी करणार आहे. कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपनीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 जुलै 2023 पर्यंत देय असलेल्या वाहनांच्या बुकिंगवर आणि 31 जुलै 2023 पर्यंतच्या डिलिव्हरींमध्ये किंमतवाढी लागू केली जाणार नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price today on 05 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय