22 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचा शेअर तुफान तेजीत येणार, आगामी IPO मुळे मोठा फायदा होणार, खरेदी करणार?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | खूप वर्षांनी टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एखाद्या कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे विद्यमान शेअर धारक, प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्स, आणि अल्फा टीसी होल्डिंग्ज, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड हे एकत्रितपणे 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. या बातमीमुळेच टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.

टाटा मोटर्समध्ये तेजी :
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने मोठी गुंतवणुक केली होती. टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 74.69 टक्के भाग भांडवल धारण करत आहे. याशिवाय अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई आणि टाटा कॅपिटल ग्रोथ हे अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत.

जेव्हापासून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे DRHP दाखल केला आहे, तेव्हापासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 505.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे आयपीओ शेअर्स खूप अल्पदरात उपलब्ध मिळणार आहे. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार आपले शेअर्स IPO अंतर्गत खुल्या बाजारात विकून आपले स्टेक कमी करणार आहे. टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी मधील भाग भांडवल कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Motors Share Price today on 10 May 2023

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x