Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसहित कोणते ऑटो शेअर्स तेजीत वाढत आहेत? टाटा मोटर्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरूवारी निफ्टी ऑटो इंडेक्स 1.09 टक्क्यांच्या वाढीसह 16169.65 अंकावर ट्रेड करत होता. आता हा निर्देशांक आपल्या 16428 या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीच्या जवळ पोहचला आहे. ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या वाढीमुळे ऑटो निर्देशांक मागील सहा महिन्यांत 31 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही ऑटो स्टॉकमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तज्ञांनी निवडलेले हे टॉप तीन ऑटो स्टॉक सेव्ह करा. आज लेखात आपण टॉप तीन ऑटो शेअर्सबद्दल माहिती जाणून घेणार, जे पुढील काळात गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवू शकतात.
टाटा मोटर्स
तज्ञांच्या मते टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 760 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 624.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. प्रभुदास लीलाधर फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर 760 रुपये लक्ष किमंत जाहीर केली आहे. मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 665.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 375.20 रुपये होती. विदेशी ब्रोकरेज कंपनी नोमुरा इंडियाला टाटा मोटर्सच्या कंपनीच्या स्टॉकवर 786 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 634.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अशोक ले लँड
तज्ञांच्या मते पुढील काळात अशोक ले लँड कंपनीचे शेअर्स 225 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 180.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 191.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 133.10 रुपये होती. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 183.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
हीरो मोटोकॉर्प
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते हीरो मोटो कॉर्प कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3630 रुपये किमतीवर जाऊ शकतात. पुढील काही महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 3535 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. चालू आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हीरो मोटो कॉर्प स्टॉक 3000 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3244 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2246 रुपये होती.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी हीरो मोटो कॉर्प कंपनीच्या शेअरवर 3535 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 3630 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.25 टक्के वाढीसह 3,065.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price today on 16 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय