Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, कोणती सकारात्मक बातमी?

Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स या ऑटो कंपनीचे शेअर्स आणखी मोठ्या उसळीसाठी सज्ज झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. टाटा मोटर्स कंपनीने All New Nexon 2023 मध्ये लाँच केल्यानंतर ब्रोकरेज हाऊसे टाटा मोटर्स स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीने आकर्षक किमतीत नेक्सॉन गाडी लाँच केल्याने याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 2023 या वर्षात टाटा मोटर्स स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 642.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा मोटर्स स्टॉक टार्गेट प्राईस
नोमुरा फर्मने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 786 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 14 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 625 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25-26 टक्के अधिक वाढ पाहायला मिळू शकते. मागील 6 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. नोमुरा फर्मच्या तज्ञांच्या मते टाटा मोटर्स कंपनीने नुकताच नेक्सॉन गाडी लॉन्च केली आहे. फेसलिफ्ट ऑल न्यू नेक्सॉन गाडीला ग्राहकांकडून जोरदार मागणी प्राप्त होण्याची शक्यता आहे.
मोतीलाल ओसवाल फर्मचे मत
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, त्यावर 750 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे टाटा मोटर्स कंपनी ई-पीव्ही उद्योगात आपले मजबूत स्थान निर्माण करणार आहे. सध्या ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स कंपनीने 80 टक्के वाटा काबीज केला आहे.
टाटा मोटर्स कंपनी पुढील 2-3 वर्षांत आणखी काही नवीन ईव्ही गाड्या लॉन्च करणार आहे. TPG समूहाकडून निधी उभारणी केल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीने आपल्या EV व्यवसायातील गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मने दिलेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स कंपनीने 14.7 लाख रुपये किमतीवर Nexon EV फेसलिफ्ट गाडी लाँच केली आहे. यासह त्या मोटर्स कंपनी ईव्ही सेगमेंटमध्ये नवीन डीलरशिप सुरू करण्याची योजना आखत आहे.
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्या म्हणजेच टाटा नेक्सॉन आणि टाटा नेक्सॉन ईव्हीची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च केली आहे. या कंपनीने 7 सप्टेंबर 2023 रोजी विविध नेक्सन कारचे अनावरण केले. कंपनीने नेक्सोन कार 4 प्रकारांत लॉन्च केली आहे. या गाड्यांची किंमत 8.09-12.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
टाटा मोटर्स कंपनीने या गाड्या 2 इंजिन व्हेरियंटसह बाजारात आणल्या आहेत. एक गाडीचा प्रकार 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, तर दुसरा प्रकार 1.5 लीटर टर्बोचार्ज डिझेल इंजिनचा आहे. भारतातील वाहन निर्मिती व्यवसायात टाटा मोटर्स कंपनीने आपले जबरदस्त वर्चस्व निर्माण केले आहे. हेवी कमर्शियल, हलके कमर्शियल प्रकारच्या वाहन प्रकारात कंपनीने आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे.
आर्थिक वर्ष 2023-2025 मध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या हेवी कमर्शियल सेगमेंटमध्ये 6 टक्के CAGR दराने आणि हलके कमर्शियल वाहन सेगमेंटमध्ये 4 टक्के CAGR दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्स कंपनीने नेक्सन कार 2017 साली बाजारात लॉन्च केली होती. 2018 मध्ये, या कारला ग्लोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग देऊन गौरवलं होते. तेव्हापासून टाटा मोटर्स कंपनीने या गड्याचे 5 लाख युनिट्स विकले आहेत. नेक्सन कार मागील 2 वर्षांपासून टाटा मोटर्स कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणारी गाडी म्हणून प्रसिद्ध आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price today on 18 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल