22 November 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनी तामिळनाडू राज्यात अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 70,800 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या टाटा पॉवर कंपनीच्या उपकंपनीने तामिळनाडू राज्याच्या नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या लँडस्केप विकासाला आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी तमिळनाडू सरकारसोबत दोन सामंजस्य करार संपन्न केले आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 344.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.26 टक्के वाढीसह 344.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने केलेल्या पहिल्या सामंजस्य करारांतर्गत ही कंपनी पुढील पाच ते सात वर्षांत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, आणि हायब्रीड म्हणजेच सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प एकाच ठिकाणी स्थापन करणार आहे. या ऊर्जा निर्मिती क्षेत्रात टाटा पॉवर कंपनी 10,000 मेगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करेल.

या अक्षय प्रकल्पाचा विस्तार तामिळनाडू राज्यात 50000 एकर जमिनीवर असेल. यामध्ये टाटा पॉवर कंपनी 70,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या उपक्रमातून सुमारे 3,000 हरित रोजगार संधी निर्माण होणार आहे.

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने केलेला दुसरा सामंजस्य करार तिरुनेलवेली जिल्ह्यातील गंगाईकोंडन याठिकाणी दोन टप्प्यात 4 GW सोलर सेल आणि सोलर मॉड्यूल प्लांट उभारण्यासाठी 3,800 कोटी रुपये गुंतवणूक करण्यासंबंधी आहे. 4 जुलै 2022 रोजी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने 3,000 कोटी रुपयेच्या MOU वर स्वाक्षरी केली होती. आता या प्रकल्पाचे मूल्य वाढून 3,800 कोटी रुपये झाले आहे.

टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर अल्पकालीन टार्गेट प्राइस म्हणून 360 रुपये ते 375 रुपये किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 325 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 10 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x