22 January 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार! कंपनीने दिली मोठी अपडेट, शेअर्सवर काय परिणाम होणार?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 3 टक्के वाढीसह 357.40 रुपये हा आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. त्यानंतर शेअरमध्ये घसरण झाली आणि टाटा पॉवर स्टॉक 1.93 टक्क्यांच्या वाढीसह 353.15 रुपये किमतीवर क्लोज झाला.

आज देखील टाटा पॉवर स्टॉक किंचित वाढीसह क्लोज झाला आहे. ब्रोकरेज फर्म अँटिकने टाटा पॉवर स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 348.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 182.35 रुपये होती. ब्रोकरेज फर्म अँटिकच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 450 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

सध्याच्या किमतीच्या रकमेत ही किंमत 30 टक्के अधिक आहे. टाटा पॉवर कंपनीकडे सध्या 4.3 गिगावॅट क्षमतेची ऑपरेशनल सोलर, पवन आणि हायब्रिड ऊर्जा निर्मिती क्षमता आहे. आर्थिक वर्ष 2027 पूर्वी टाटा पॉवर कंपनीने आपली वीज निर्मिती क्षमता 10 गिगावॅटने वाढवण्याची योजना आखली आहे. जर कंपनीची वीज निर्मिती क्षमता 14 GW वर पोहोचली. तर कंपनीचा EBITDA 8,400 कोटी रुपये वाढू शकतो.

टाटा पॉवर कंपनीने तामिळनाडू राज्यात 70800 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने तामिळनाडू राज्य सरकारसोबत दोन मोठी करार संपन्न केले आहेत. या करारांतर्गत टाटा पॉवर कंपनीने तामिळनाडूमध्ये 70800 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

पहिल्या सामंजस्य करारांतर्गत, TPREL कंपनी पुढील पाच ते सात वर्षांत सौर, पवन, संकरित यांसारख्या क्षेत्रात 10,000 मेगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. 50 हजार एकर जमिनीवर या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 70,000 कोटी रुपयेची गुंतवणूक केली जाईल.

दुसऱ्या सामंजस्य करारा अंतर्गत तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यात गंगाईकोंडाकोन येथे दोन टप्प्यात 4 GW क्षमतेचा सोलार सेल आणि सोलर मॉड्युल प्लांट उभारण्यात येणार आहे. टाटा पॉवर कंपनी या प्रकल्पात सुमारे 3,800 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. 4 जुलै 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीने हा सामंजस्य करार केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 19 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x