30 January 2025 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित टाटा ग्रुपचे 3 शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, दिग्गजांनी देखील खरेदी केले, कारण काय?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स लक्षणीय तेजीत वाढत आहेत. मागील काही महिन्यांपासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने कमालीची कामगिरी केली आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.

टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी, टाटा पॉवर, टाटा कम्युनिकेशन्स, या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना काहीसा आधार देत आहेत. एवढेच नाही तर शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी आणि टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे.

इंडियन हॉटेल्स शेअर्स

राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे 3,00,16,965 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 2.11 टक्के आहेत. आणि रेखा झुनझुनवालाकडे टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 52,34,687 शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 1.84 टक्के भाग भांडवल आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स जानेवारी 2023 च्या शेवटच्या आठवड्यापासून जबरदस्त वाढत आहेत.

27 जानेवारी 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 286.45 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते आणि आता हा स्टॉक 436.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमधून YTD आधारे 35 टक्के परतावा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 430.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा कम्युनिकेशन्स शेअर

टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत 1908 रुपये होती. ऑक्टोबर 2022 पासून टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर तेजीत वाढत आहेत. मागील दहा महिन्यांत रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेला हा स्टॉक 1115 रुपयेवरून वाढून 1908 रुपये किमतीवर पोहचला आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 70 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.095 टक्के वाढीसह 1891.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर शेअर्स

टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 263.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 3.92 टक्के वाढीसह 274.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 185 रुपयेवरून वाढून 274 रुपयेवर पोहचले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 08 September 2023.

हॅशटॅग्स

Tata Group Stock Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x