17 April 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Tata Steel Share Price | मस्तच! टाटा ग्रुपच्या फक्त 118 रुपयांच्या या शेअरवर तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस, तेजीचे कारण?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात पडझड सुरू झाली होती, आणि साऱ्या जगातील शेअर बाजारात एक प्रकारची अस्थिरता पसरली होती. आता जवळपास एक वर्षानंतर परत ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीज फर्मने भारतीय मेटल स्टॉकबाबत सकारात्मक विश्वास व्यक्त केला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चीनने कोविड नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. जेफरीज फर्मच्या मते शेअर बाजारातील कमाईच्या बाबतीत सर्वात वाईट काळ आता गेला आहे, अशा परिस्थितीत पुढे येणाऱ्या काळात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. हे स्टॉक पुढील काळात चांगला परतावा कमावून देऊ शकतो, असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)

ब्रोकरेज हाऊस जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 150 रुपयेपर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊसने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर ‘ बाय ‘ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वधारली आहे. अवघ्या एक महिनाभरापूर्वी ज्या लोकांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना सध्या तीन टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला असणार. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 3.11 टक्के वाढीसह 116.15 रुपयांवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 118.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मेटल सेक्टरमध्ये तेजी येण्याचे संकेत :
टाटा स्टील कंपनी व्यतिरिक्त तज्ञांनी हिंदाल्को कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज वर्तवला आहे की, हिंदाल्को कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 600 रुपये किंमत पार करतील. याशिवाय जेफरीज फर्मने स्टॉक ‘ बाय ‘ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा स्टील आणि हिंदाल्को व्यतिरिक्त ब्रोकरेज फर्मने JSW स्टील बाबतही सकारात्मक मत व्यक्त केले आहे. जेफरीजने JSW स्टील कंपनीच्या स्टॉकवर 470 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तज्ञ कोल इंडिया कंपनीच्या शेअर्स वरही तज्ञांनी 220 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price 500470 TATASTEEL check details on 03 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या