23 April 2025 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर अल्पावधीत 45 टक्के परतावा देऊ शकतो, काय म्हणाले तज्ज्ञ?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 165 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 103.25 रुपये होती. ( टाटा स्टील कंपनी अंश )

मागील एका वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 56.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 165.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 4 महिन्यांपासून टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये 151 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 45 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

टाटा स्टील कंपनीला आपल्या युरोपीयन व्यावयातून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. या कंपनीच्या आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे. कंपनीने आपल्या देशांतर्गत कामकाजावर धोरणात्मकपणे लक्ष केंद्रित केले आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 173 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. त्यानंतर हा स्टॉक 195 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये 156 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. पुढील काळात हा स्टॉक 181 रुपये किमतीवर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 195 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 03 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या