11 January 2025 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Tata Steel Share Price | तज्ज्ञांकडून टाटा स्टील स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 167.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 178 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जून 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 105.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जुन 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.84 टक्के वाढीसह 171.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काही दिवसात 180 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा स्टील स्टॉकवर 195 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा नफा 64.59 टक्क्यांनी घसरून 554.56 कोटी रुपयेवर आला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात टाटा स्टील कंपनीने 1,566.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत टाटा स्टील कंपनीचे एकूण उत्पन्न 63,131.08 कोटी रुपयेवरून घसरून 58,863.22 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या कंपनीचा खर्च मागील वर्षी 59,918.15 कोटी रुपये होता, जो आता 56,496,88 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी 3.60 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

टाटा स्टील कंपनीचा यूकेस्थित स्टील व्यवसाय अनेक अडचणींना सामोरे जात आहे. ब्रिटनच्या स्टीलवर्कर्स युनियनने टाटा स्टील कंपनीच्या पोर्ट टॅलबोट आणि न्यूपोर्ट लॅनव्हर्न प्लांटमधील 1,500 कामगारांनी टाळेबंदीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. टाटा स्टील कंपनीने आपली जुनी ब्लास्ट फर्नेस बंद केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा आली होती.

एप्रिल 2024 मध्ये टाटा स्टील कंपनीने वेल्समधील पोर्ट टॅल्बोट स्टील वर्क्स कंपनीमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक आर्क फर्नेस बसवण्यासाठी 1.25 बिलियन डॉलर्स गुंतवणूक केली होती. यासह कंपनीने दोन जुन्या ब्लास्ट फर्नेस बंद करण्याची घोषणा केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 03 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x