Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये ब्रेकआउटचे संकेत, मिळणार मोठा परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे शेअर्स बुधवारी 4.34 टक्के वाढीसह 175.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.18 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टीलचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 60.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक अद्याप ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. ( टाटा स्टील कंपनी अंश )
टाटा स्टील स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स टक्के घसरणीसह 173.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक टेक्निकल चार्टवर हायर हाय फॉर्मेशन तयार करत आहे. तज्ञांच्या मते, टाटा स्टील पुढील दोन आठवड्यांत अनुक्रमे 185 रुपये आणि 195 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर पैसे लावताना 155 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
Tips2Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉकमध्ये 182 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. हा स्टॉक 168 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण करत आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून टाटा स्टील स्टॉक 158 रुपये ते 170 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये ट्रेड करत आहे.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टीलमध्ये 172 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 172 रुपये किमतीवर स्टॉप लॉसलावून 185 रुपये ते 190 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करायला हवा. स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक 175 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देत आहे. हा स्टॉक पुढील काळात 191 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 167.90 रुपये किमतीवर ओपन झाला होता. या कंपनीचे बाजार भांडवल 2.18 लाख कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टाटा स्टील स्टॉक 25 टक्के वाढला आहे. हा स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.
31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 515-कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीने 2,224 कोटीं रुपये तोटा नोंदवला होता. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत जगातील सर्वात जास्त स्टील उत्पादन करणाऱ्या चीनकडून स्वस्त शिपमेंट झाल्याने स्थानिक पातळीवर स्टीलच्या किमती कमी झाल्या आहेत.
डिसेंबर 2022 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 57,084 रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा महसूल 3 टक्के घसरून 55,312 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टाटा स्टील इंडिया कंपनीने 20.8 मेट्रिक टन इतके वार्षिक कच्च्या स्टीलचे सर्वाधिक उत्पादन केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price NSE Live 23 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे