Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात 108% परतावा देणाऱ्या टाटा स्टील शेअर्सबाबत अपडेट, फायदा होईल?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. सेबी फाइलिंगनुसार टाटा स्टील कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये टाटा स्टील कंपनीला 2502 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
मात्र आता ऑक्टोबर-डिसेंबर 2023 च्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 522.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 134.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 57,083.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीचा माहुसल किंचित घटला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 55,311.9 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा EBITDA 4048 कोटी रुपयेवरून वाढून 6,263.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. यासह कंपनीचा EBITDA मार्जिन डिसेंबर 2023 तिमाहीत 7.1 टक्केवरून वाढून 11.3 टक्के नोंदवला गेला आहे.
मागील एका आठवड्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2.66 टक्के परतावा कमावून आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 1.20 टक्के वाढली होती. मागील 3 महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 12.62 टक्के मजबूत झाली होती. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 12.25 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल 108.89 टक्के वाढवले आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर 3.88 टक्के वाढीसह 135.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 101.65 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price NSE Live 25 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO