23 April 2025 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी पोर्ट टॅलबोटमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक आर्क फर्नेस तयार करण्यासाठी 1.25 अब्ज पौंड गुंतवणुक करण्याचा विचार करत आहे. टाटा स्टील कंपनीने यूके सरकारच्या सहकार्याने पोर्ट टॅलबोटमध्ये पोलाद उत्पादन करण्यासाठी इलेक्ट्रिक आर्क फर्नेस तयार करण्याकरता 1.25 अब्ज पौंड गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

टाटा स्टील कंपनीने जानेवारी 2024 मध्ये यूकेस्थित चार सक्रिय ब्लास्ट फर्नेसपैकी दोन प्लांट बंद करण्याची घोषणा केली होती. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.89 टक्के घसरणीसह 166.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

यूकेस्थित कामगार संघटनांसोबत 7 महिन्यांच्या औपचारिक आणि अनौपचारिक स्तरावरील चर्चेनंतर, टाटा स्टील कंपनीने पोर्ट टॅलबोट प्लांटमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक आर्क फर्नेस तयार करण्याकरता 1.25 बिलियन पौंड गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा समूहाचा भाग असलेली टाटा मोटर्स कंपनी 10 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या मार्च 2024 तिमाहीतील कामगिरीवर चर्चा करणार आहे. टाटा मोटर्स ग्रुपचे सीएफओ पीबी बालाजी, टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र, जॅग्वार लँड रोव्हरचे सीईओ एड्रियन मार्डेल आणि जग्वार लँड रोव्हरचे सीएफओ रिचर्ड मॉलिनक्स 10 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

याशिवाय टाटा मोटर्स कंपनीने टाटा मोटर्स आणि Tata Motors DVR कंपनीच्या विलगीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी जुलै 2023 मध्ये संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. टाटा मोटर्स कंपनी आपल्या 7 शेअर्सवर टाटा मोटर्स डीव्हीआर कंपनीचे 10 शेअर्स जारी करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 27 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या