
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. चालू आठवड्यात कंपनी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी या कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 163.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
मागील तीन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स फक्त 3 टक्के वाढले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 3.27 टक्के वाढीसह 162.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जून महिन्यात 5 टक्के पेक्षा जास्त घसरल्यानंतर टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात 3.07 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 35.56 टक्के वाढली होती.
टाटा स्टील कंपनीचे क्रूड स्टीलचे उत्पादन मागील तिमाहीत 5.25 दशलक्ष टन वर पोहचले होते. यात वार्षिक आधारावर 5 टक्के वाढ झाली आहे. टाटा स्टील कंपनीची स्टील डिलिव्हरी 4.94 दशलक्ष टन नोंदवली गेली होती. यात वार्षिक आधारावर 3 टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने टाटा स्टील स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 26 जुलै 2024 रोजीच्या अहवालात, ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील स्टॉकवर 180 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























