27 January 2025 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाची स्टील उत्पादक टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मागील ६ महिन्यात 19.72 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच जानेवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या ११ ट्रेडिंग सेशन्सपैकी सात वेळा टाटा स्टील शेअर प्राईस घसरली आहे. मागील एक महिन्यात हा शेअर 7.02 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र टाटा स्टील शेअरबाबत अनेक ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय. जिओजित ब्रोकरेज फर्मने सुद्धा टाटा स्टील शेअरसाठी ‘होल्ड’ रेटिंग दिली आहे.

‎1 जानेवारी 1999 रोजी 6.95 रुपयांवर ट्रेड करणारा टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 130.50 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 130.37 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात टाटा स्टील शेअर 129.31 रुपये ते 133.20 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील १ वर्षात टाटा स्टील कंपनी स्टॉक 122.62 रुपये ते 184.60 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 175 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

ट्रेंडलिनच्या आकडेवारीनुसार, टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी 30 स्टॉक मार्केट विश्लेषकांनी रेटिंग जाहीर केली आहे. 30 पैकी 11 विश्लेषकांनी ‘स्ट्राँग बाय’ रेटिंग दिल असून आणि 5 विश्लेषकांनी ‘बाय’ रेटिंग दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या ईपीएसमध्ये 239 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. टाटा स्टील शेअरसाठी 160.73 रुपये सरासरी टार्गेट प्राइस देण्यात आली आहे. ही टार्गेट प्राईस सध्याच्या किंमतीपेक्षा 27 टक्क्यांनी अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Saturday 27 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x