Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स उच्चांक किमतीवर पोहोचले, 'या' बातमीने शेअर्सवर काय परिणाम होणार? फायद्याची बातमी

Tata Steel Share Price | सध्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. नुकताच ब्रिटीश सरकार आणि टाटाची स्टील कंपनी यांनी एक करार केला आहे, त्यामुळे टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 134.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता विविध ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात टाटा स्टील स्टॉक 15 टक्के पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 131.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा स्टील टार्गेट प्राईस
ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील 1 वर्षात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 142 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने टाटा स्टील कंपनीचे शेअरवर ‘बाय’ अँड ‘होल्ड’ चा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील स्टॉक पुढील काळात 145 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत लक्ष किंमत 10 टक्के जास्त आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर 120 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 9 टक्के जास्त आहे. तर ब्रोकरेज प्रभुदास लीलाधर यांनी टाटा स्टील स्टॉकवर 144 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
नवीन करार
ब्रिटिश सरकारने टाटा स्टील कंपनीच्या वेल्समधील स्टील प्लांटमध्ये 1.25 अब्ज पौंड गुंतवणुक करण्याची संयुक्त योजना जाहीर केली आहे. यासाठी ब्रिटिश सरकार टाटा स्टील कंपनीला 500 दशलक्ष पौंड अनुदान जारी करणार आहे. हे अनुदान ब्रिटनमधील सर्वात मोठ्या पोलाद निर्मिती प्लांटमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. ब्रिटिश सरकारने जारी केलेले हे अनुदान ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठे सरकारी अनुदान असेल.
ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट, साउथ वेल्स स्थित टाटा स्टील कंपनीच्या पोलाद कारखान्यात 8,000 पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. याशिवाय 12,500 लोक पुरवठा संबंधित कामांमध्ये गुंतलेले आहेत. ब्रिटन सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाबाबत माहिती देताना टाटा स्टील कंपनी सांगितले की, कंपनीच्या पोलाद निर्मिती कारखान्यांत सध्याच्या कोळशावर चालणाऱ्या भट्टींची जागा नवीन इलेक्ट्रिक फर्नेस घेणार आहे. या ब्रिटनमधील एकूण कार्बन उत्सर्जन प्रमाण 1.5 टक्के घटण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price today on 20 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL