23 April 2025 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टीलच्या शेअरबाबत तज्ज्ञ सकारात्मक, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअरची कामगिरी जाणून घ्या

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिनाभरात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 5.21 टक्के मजबूत झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 114.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

19 जानेवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचा स्टॉक 124.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के घसरणीसह 111.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 131 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकमध्ये 124-131 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी 104 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स प्रतिकूल स्थूल आर्थिक वातावरण आणि भू-राजकीय अस्थिरता असूनही वाढीचे संकेत देत आहेत.

पुढील काळात जगभरातून स्टीलची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवालचे तज्ञ म्हणले की, टाटा स्टील आणि त्यांच्या सात उपकंपन्या आणि एका सहयोगी कंपनीची विलीनीकरण प्रक्रिया FY24 च्या अखेरीस पूर्ण होऊ शकते. याचा फायदा देखील टाटा स्टील कंपनीला होणार आहे.

ब्रोकरेज फर्मचे तज्ञ टाटा स्टील स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. कंपनीची देशांतर्गत क्षमता 21 दशलक्ष टनांवरून वाढून 40 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 82.5 टक्के वाढीसह 1,705 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षी याच तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीने 9,756 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीच्या महसुलात 9 टक्क्यांची घसरण झाली आहे, आणि कंपनीने या काळात 62.962 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price today on 22 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या