15 January 2025 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. दुसरीकडे, टाटा स्टील कंपनी शेअर सातत्याने घसरत आहे. मात्र मंगळवारी टाटा स्टील शेअर 3.28% टक्क्यांनी वधारून 126.96 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरची 13 महिन्यांतील नीचांकी पातळी

मात्र सोमवारी टाटा स्टील शेअर 122.94 रुपयांवर पोहोचला होता. ही शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी होती. जून २०२४ रोजीच्या १८४.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून टाटा स्टील शेअर २८ टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारची १२४.१८ रुपयांची नीचांकी पातळी ही शेअरची १३ महिन्यांतील नीचांकी पातळी होती.

टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण होण्याची कारणे

मागील काही दिवसांपासून टाटा स्टील शेअर जबरदस्त घसरला आहे. टाटा स्टील शेअर बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी ५० चा भाग आहे. टाटा स्टील कंपनीने नुकतेच तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट्स जारी केले आहेत. तिसऱ्या तिमाहीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीने देशांतर्गत कच्च्या पोलादाच्या उत्पादनात ६.१७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कलिंगनगर येथे टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ब्लास्ट फर्नेसच्या रॅम्पअपमुळे उत्पादनात ही वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत मजबूत देशांतर्गत विक्री आणि धोरणात्मक निर्यात उपक्रमांमुळे डिलिव्हरी विक्रमी ५.२९ दशलक्ष टनांवर पोहोचल्याचे टाटा स्टील कंपनीने म्हटले आहे.

टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने धातू क्षेत्राबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या या रिपोर्टमध्ये टाटा स्टील कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवण्यात आली आहे. परंतु टार्गेट प्राईस १७० रुपयांवरून घटवून १५५ रुपये केली आहे.

टाटा स्टील शेअरने मल्टीबॅगर परतावा दिला

टाटा स्टील शेअर मागील ५ दिवसात 4.11% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 14.09 टक्के घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 23.87% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 5.89% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा स्टील शेअरने 156.33% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये टाटा स्टील शेअरने 1,726.76% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(129)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x