23 April 2025 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार; मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL
x

Tata Steel Vs Jindal Steel Share | फायद्याचा पोलादी शेअर कोणता? टाटा स्टील की जिंदाल स्टील पॉवर? अल्पावधीत कोण होणार मल्टिबॅगर?

Tata Steel Vs Jindal Steel Share

Tata Steel Vs Jindal Steel Share | जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यांनतर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सध्या जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स 4 महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांच्या घसरणीसह 590 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 59340 कोटी रुपये आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 722 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 454 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 587.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 16 टक्क्यांनी घसरले आहेत. जिंदाल स्टील कंपनीच्या शेअर्सनी 1 नोव्हेंबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 याकाळात आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 27 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 जून 2023 रोजी जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 500 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 18 टक्के वाढले आहेत.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.3 पट वाढ झाली आहे. आणि कंपनीने या तिमाहीत 1390 कोटी रुपये नफा कमावला आहे. याच तिमाहीत जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीचा महसूल 9.02 टक्के घसरून 12282 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीचे 1.45 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 879 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत कमकुवत तिमाहीत कामगिरीने जिंदाल स्टील स्टॉकबाबत गुंतवणूकदार निराश आहेत. जिंदाल स्टील कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना सहा महिने पुढे ढकलली आहे.

जिंदाल स्टील कंपनीने 31000 कोटी रुपयेची कॅपेक्स योजना आखली होती. त्यानंतर अनेक तज्ञांनी जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली होती. तज्ञांनी जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर 880 ते 900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. आणि मोतीलाल ओसवाल फर्मने जिंदाल स्टील कंपनी शेअरवर 730 रुपये लक्ष किंमत निश्चित केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Vs Jindal Steel Share NSE 02 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Steel Vs Jindal Steel Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या