Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर प्राईस बँड सहित फायद्याची माहिती समोर आली
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूह आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. टाटा समूहाने आपला शेवटचा IPO 2004 साली TCS कंपनीचा लाँच केला होता.
टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र आता टाटा समूहाने ही कंपनी स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या शेअरची प्राईस बँड 475 रुपये ते 500 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे.
या कंपनीचा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत लाँच करण्यात येईल. IPOअंतर्गत टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आपले 9 कोटी 57 लाख इक्विटी शेअर्स म्हणजेच जवळपास 23.6 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. हे समभाग टाटा मोटर्स, अल्फा टीसी होल्डिंग्ज आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड यांच्या द्वारे विकले जाणार आहेत.
सध्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रवर्तक गटाने कंपनीचे 76.7 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीच्या गैर-प्रवर्तक गटाने या कंपनीचे एकूण 23.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. IPO नंतर कंपनीच्या प्रवर्तक गटाचा वाटा 56.7 टक्के होईल.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये नॉन-प्रमोटर ग्रुपने एकूण 43.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीने मार्च 2023 मध्ये IPO साठी कागदपत्रे सेबीकडे सादर केली होती. 27 जून रोजी SEBI ने कंपनीच्या IPO ला मंजुरी दिली होती. टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा मोटर्सची उपकंपनी जागतिक अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी उपकरण उत्पादकांना उत्पादन विकास आणि टर्नकी सोल्यूशन्ससह डिजिटल सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी वाहतूक, एरोस्पेस आणि अवजड यंत्रसामग्री यासारख्या उद्योगामध्ये गुंतलेल्या कंपन्यांना सेवा प्रदान करण्याचे काम करते.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीबाबत सकारात्मक बाब म्हणजे, या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 25 टक्क्यांच्या वाढीसह 4,418 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर कंपनीने 63 टक्क्यांच्या वाढीसह 708 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-23 मध्ये, या कंपनीने महसुल चक्रवाढ वार्षिक वाढ दर 30 टक्के नोंदवला आहे.
कंपनीचा EBITDA CAGR 46 टक्के आणि PAT CAGR 61.5 टक्के नोंदवला गेला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने आपले टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमधील 9.9 टक्के शेअर विकले होते. यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे मूल्यांकन 16,300 कोटी रुपये करण्यात आले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 9 टक्के भाग भांडवल टीपीजी राइस क्लायमेट एसएफ पीटीईने खरेदी केले आहे. टीपीजी राइस क्लायमेट एसएफ पीटीईने यापूर्वीच टाटा मोटर कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी युनिटमध्ये आधीच 1 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. याशिवाय उर्वरित हिस्सा रतन टाटा एंडोमेंटने खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे.
या शेअर विक्रीपूर्वी टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सप्टेंबर तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीवर एकूण 38700 कोटी रुपये कर्ज आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीवर 41700 कोटी रुपये कर्ज होते. 2024 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने आपला देशांतर्गत व्यवसाय पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे ठरवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Technologies IPO for investment on 16 November 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार