22 November 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Tata Technologies IPO | होय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअर्स अल्पावधीत तुमचा पैसा दुप्पट करणार, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO द्वारे ही कंपनी 3042.5 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीचा आयपीओ 2004 साली लाँच करण्यात आला होता.

शेअर बाजार तज्ज्ञ म्हणाले…
तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रवर्तक खूप मजबूत आणि अनुभवी आहेत. डिजिटल आणि तंत्रज्ञान कौशल्यांबाबत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपले नाव प्रस्थापित केले आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी मजबूत रोख प्रवाह असलेली आणि पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. शेअर बाजार तज्ज्ञ अनिल सिंघवी म्हणाले की टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर अल्पावधीत दुप्पट होऊ शकतात. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या व्यवसायाचा एक तृतीयांश भाग टाटा समूहाच्या इतर कंपनीकडून येतो.

टाटा टेक्नॉलॉजी IPO तपशील:
* IPO चा कालावधी : 22 ते 24 नोव्हेंबर 2023
* शेअरची किंमत बँड : 475 रुपये ते 500 रुपये
* IPO चा आकार : 3042.5 कोटी रुपये
* IPO लॉट साइज : 30 शेअर्स प्रति लॉट
* किमान गुंतवणूक रक्कम : 15,000 रुपये

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओला अँकर गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीने आपल्या प्री-आयपीओ सेशनमध्ये 67 अँकर गुंतवणूकदारांकडून 791 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 1.58 कोटी शेअर्स गुंतवणूकदारांना 500 रुपये किमतीवर जारी केले आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अँकर गुंतवणूकदारांमध्ये फिडेलिटी फंड, एसबीआय फंड, आयसीआयसीआय प्रू फंड, बीएनपी परिबा, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, निप्पॉन इंडिया फंड, यासारख्या दिग्गज संस्था सामील आहेत.

टाटा उद्योग समूहाचा शेवटचा IPO 2004 साली TCS कंपनीचा होता. या IPO नंतर टाटा समूहाने लाँच केलेला पहिला IPO टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO उघडण्याच्या एक महिना आधी कंपनीच्या मुख्य प्रवर्तक असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले 9 टक्के भाग भांडवल TPG Rise Climate SF ला 401.81 रुपये किमतीवर विकले होते.

या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1467 कोटी रुपये होते. ही गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे मूल्यांकन 16300 कोटी रुपये केले होते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे नवीन मूल्यांकन आता 19200-20300 कोटी रुपये आहे.

मागील एका महिन्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे मूल्यांकन 3000-4000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 18-25 टक्के वाढले आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी जागतिक OEM आणि TIER-1 पुरवठादारांना उत्पादन विकास आणि डिजिटल समाधान सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये 11000 कर्मचारी काम करत आहेत. यासह कंपनीचे एकूण 18 जागतिक वितरण केंद्रे कार्यरत आहेत. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या IPO मधील ऑफर फॉर सेल अंतर्गत 10 टक्के वाटा आपल्या पात्र शेअर धारकांसाठी राखीव ठेवला आहे. कंपनीचे पात्र शेअरहोल्डर म्हणजे सामान्य गुंतवणुकदार व्यक्ती आणि HUF सह सार्वजनिक इक्विटी भागधारक यांना टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र गृहीत मानण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO GMP Today 23 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x