22 February 2025 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज
x

Tata Technologies IPO | आला रे आला टाटा ग्रुपचा IPO आला! नो घाटा म्हणून टाटा, लाँच पूर्वी पैसे तयार ठेवा

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | जर तुम्ही प्रायमरी बाजारात पैसे गुंतवून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर टाटा ग्रुप संधी देणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा ग्रुपची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यापूर्वी २००४ मध्ये टाटा समूहाची बलाढ्य कंपनी टीसीएसचा आयपीओ आला होता. टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा (आयपीओ) मसुदा दाखल केला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी असून कंपनीने ९ मार्च रोजी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता. (Tata Technologies Share Price, Tata Technologies Stock Price)

टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओबद्दल
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसने दिलेल्या माहितीनुसार, या इश्यूमध्ये कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि भागधारकांनी 9.57 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर दिली आहे. ओएफएसमध्ये टाटा मोटर्सचे ८.१३ कोटी शेअर्स, अल्फा टीसी होल्डिंग्स पीटीईचे ९७.२ लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ चे ४८.६ लाख शेअर्सचा समावेश आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये होल्डिंग्स
सध्या टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये टाटा मोटर्सची ७४.६९ टक्के, तर अल्फा टीसी होल्डिंग्स पीटीईची ७.२६ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ ची कंपनीत ३.६३ टक्के हिस्सेदारी आहे.

लीड बुक मॅनेजर
या आयपीओचे लीड बुक मॅनेजर जेएम फायनान्शिअल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया असतील. कंपनीने नुकतेच सेबीकडे आपला आयपीओ दाखल केला आहे. मात्र, आयपीओच्या माध्यमातून किती निधी उभारला जाईल आणि आयपीओची किंमत किती असेल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनी काय करते
टाटा टेक्नॉलॉजीची सुरुवात ३३ वर्षांपूर्वी झाली होती. टाटा टेक्नॉलॉजीज प्रॉडक्ट इंजिनीअरिंग आणि डिजिटल सर्व्हिसेसचा व्यवसाय करते. ही कंपनी ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल हेवी मशिनरी आणि एअरोस्पेस सेक्टरला सेवा पुरवते. कंपनी व्यवसायासाठी टाटा समूहातील इतर कंपन्या टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हरवर अवलंबून आहे. सायंट, इन्फोसिस, केपीआयटी टेक्नॉलॉजीज, पर्सिस्टंट हे या कंपनीचे स्पर्धक आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Technologies IPO will be launch soon check details on 10 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x