20 April 2025 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

Tata Technologies Share Price | तज्ज्ञांकडून टाटा टेक शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत घसरले होते. दिवसभरात हा स्टॉक 989 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांच्या घसरणीसह 162.03 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.14 टक्के घसरणीसह 995.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे कामकाजी महसूल वार्षिक आधारावर 0.9 टक्क्यांच्या घसरणीसह 1269 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जून तिमाहीच्या निकालानंतर अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा टेक स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा टेक स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 650 रुपये किमतीवर येऊ शकतो. आर्थिक वर्ष 2025-27 पर्यंत टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकच्या EPS मध्ये 12-15 टक्के घट होऊ शकते.

जेएम फायनान्शिअल फर्मच्या तज्ञांनी टाटा टेक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घकाळात 1250 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ब्रोकरेज फर्मच्या मते, कंपनीच्या महसुलात घट होऊन देखील मार्जिनमध्ये लवचिकता पाहायला मिळत आहे. जून तिमाहीतील कमकुवत कामगिरीनंतर ब्रोकरेजच्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीचा यूएस डॉलर चलन महसूल 500 बेसिस पॉइंटने खाली येऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 22 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या